शिवप्रहार न्यूज- राहुरीत वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई7 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवप्रहार न्यूज-  राहुरीत वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई7 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

राहुरीत वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

7 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

राहुरी (शिवप्रहार न्युज)- पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेशाने राहुरी पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदयावर कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तनपुरेवाडी रोड ता. राहुरी गावचे शिवारातील तनपुरेवाडी रोडने राहुरीचे दिशेन इसम नामे राजेंद्र गुंजाळ हा त्याचे कडील विटकरी रंगाचे टेम्पो मधुन शासकिय वाळुची चोरुन वाहतुक करीत आहे आत्ता गेल्यास मिळुन येईल. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोहेकॉ.सुरेश माळी, पोना. लक्ष्मण खोकले, पोना.शंकर चौधरी, पोना.रविकिरण सोनटक्के, पोना.रणजीत जाधव, पोना.राहुल सोळंके, सर्व नेमणुक स्थानिक गुहे शाखा अ.नगर असे नमुद पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने निघुन बातमीतील ठिकाणी तनपुरेवाडी रोडने जावून राहिबाई मंदिराजवळ जावून सापळा लावला असता तनपुरेवाडी रोडने राहुरीचे दिशेन एक विटकरी रंगाचा टॅम्पो येताना दिसला. बातमीप्रमाणे खात्री पटताच 3.30 वा. सदर टेम्पोच्या पाठीमागील हौदयामध्ये वाळू असल्याची खात्री झाल्याने सदर टेम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राजेंद्र अर्जुन गुंजाळ, वय-26, रा. मुलणमाथा, राहुरी बु. ता. राहुरी, जि.अ.नगर असे सांगितले. सदर चालकास वाळु वाहतुकीचा परवानाबाबत विचारपुस केली असता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले. तसेच सदरचे टेम्पो मालका बाबत विचारपुस करता चालकाने सदर टेम्पोचा मालक मिच आहे असे सांगितले. सदर टेम्पो चालक/मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे वाळु चोरी करून पर्यावरणाचा र्‍हास करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे. यावेळी 14 लाख रूपये किंमतीचा टाटा कंपनीचा विटकरी रंगाचा 909 टेम्पो, 20 हजार रूपचे किंमतीची 2 ब्रास शासकीय वाळू असा 4 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रमाणे मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सदर टेम्पो व शासकिय वाळुचा पंचनामा पोहेकॉ . जायभाय यांनी जागीच लाईटचे उजेडात करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन आरोपी व मुददेमालासह पोलीस स्टेशनला आले.

याप्रकरणी आरोपी राजेंद्र गुंजाळ विरूद्ध पोना.लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 379 सह पर्यावण कायदा कलम 3.15 प्रमाणे राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या कारवाईबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने राहुरी पोलीस स्टेशन हददीत अवैध धंद्यावर कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डिग्रस ता. राहुरी गावचे शिवारातील मुळा नदी पात्रामध्ये एक इसम हा त्याचे कडील पांढरे रंगाची झेनॉन मधुन शासकिय वाळुची चोरुन वाहतुक करीत आहे. आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील कर्मचार्‍यांनी आरोपी 1) भिमराज गुलाब बर्डे वय 25 रा. बारागाव नांदुर ता राहुरी, जि. अ.नगर असे सांगितले. सदर चालकास वाळु वाहतुकीचा परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले. तसेच सदरचे झेनॉन मालका बाबत विचारपुस करता चालकाने सदर गाडीचा मालक मीच आहे असे सांगितले. सदर झेनॉन चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे वाळु चोरी करुन पर्यावरणाचा -हास करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे.

3,00,000/- रु. किमतीची एक विना क्रमांकाची पांढरे रंगाची झेनॉन गाडी तिचा चे.सी. क्र चअढ5 24005एडउ01546 असा व 10,000/- रु किमतीची 1 ब्रास शासकिय वाळु असा एकूण 3,10,000/- किंमतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील वर्णनाची व किमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सदर झेनॉन व शासकिय वाळुचा पंचनामा पोहेकॉ जायभाय यांनी लाईटचे उजेडात जागीच करुन वरील मुद्देमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवून आरोपी व मुद्देमालासह पोलीस स्टेशनला आलो.

तरी दि. 13 डिसेंबर 2022 रोजी 02.00 वा सुमारास डिग्रस ता. राहुरी गावचे शिवारातील मुळा नदी पात्रामध्ये येथे विना क्रमांकाची पांढरे रंगाची झेनॉन यावरील चालक 1) भिमराज गुलाब बर्डे वय 25 रा. बारागाव नांदुर ता राहुरी, जि. अ. नगर येथून नदी पात्रातून बेकायदेशिरपणे 1 ब्रास शासकिय वाळुची चोरी करुन पर्यावरणाचा -हास करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे त्याचे विरुध्द पोलीस नाईक लक्ष्मण चिंधू खोकले यांनी भादवि कलम 379 आरोपी विरोधात फिर्याद देऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करत आहेत.