शिवप्रहार न्युज - गोंधवणीच्या तरुणाचा खून करणारे श्रीरामपुरातील दोघे LCB ने पकडले...

शिवप्रहार न्युज - गोंधवणीच्या तरुणाचा खून करणारे श्रीरामपुरातील दोघे LCB ने पकडले...

गोंधवणीच्या तरुणाचा खून करणारे श्रीरामपुरातील दोघे LCB ने पकडले...

श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- जबरी चोरीच्या उद्देशाने श्रीरामपूर येथील तरूणाचा खुन करणाऱ्या सराईत आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०८/०७/२३ रोजी फिर्यादी नवनाथ दादासाहेब चौधरी, वय-४१, रा. भैरवनाथ नगर, गोंधवणी, ता. श्रीरामपूर यांचा मयत भाचा सुधीर अशोक कांदे वय ३५, रा.गोंधवणी, ता.श्रीरामपूर यास अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने भोसकुन, जखमी करुन जिवे ठार मारले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन राहाता पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. ३५६ / २०२३ भादविक ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर यांनी पोनि.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

   नमुद आदेशा प्रमाणे पोनि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि.हेमंत थोरात,

पोहेकाँ.दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, पोना.रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोकॉ.मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन संशयीत मयुर काळे व किरण काकफळे दोघे रा.श्रीरामपूर यांचा शोध घेवुन ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे मथुर विजय काळे वय २१, रा. रेणुकानगर सुतगिरणी, ता. श्रीरामपूर व किरण सुरेश काकफळे वय-२४, रा. रमानगर, सुतगिरणी, ता.श्रीरामपूर असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी मयत इसम रस्त्याने पायी जाताना त्यास लिफ्ट देण्याचा बहाण्याने मोटार सायकलवर बसवुन निर्जनस्थळी नेवुन लुटण्याचे उद्देशाने चाकुने मारुन जखमी करुन जिवे ठार मारुन त्याचा मोबाईल फोन घेवुन गेलो अशी हकिगत सांगितल्याने दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना राहाता पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन करीता आहे.