शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यातून पटारे यांची १२ हजारांची शेळी चोरली...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यातून पटारे यांची १२ हजारांची शेळी चोरली...

श्रीरामपूर तालुक्यातून पटारे यांची १२ हजारांची शेळी चोरली...

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील खोकर शिवारात असणाऱ्या पटारे वस्तीवर राहणारे शेतकरी मिनीनाथ गंगाधर पटारे, वय 39 वर्ष ,धंदा -शेती,राहणार-खोकर यांच्या मालकीची शेळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

        या शेळीचे वय पाच ते सहा वर्षे असून शेळीची किंमत सुमारे 12 हजार रुपये इतकी आहे. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास ही शेळी चोरून नेली आहे.

        याप्रकरणी पटारे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या शेळीला व आरोपीला शोधण्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत.

        गुन्ह्याच्या घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.साळवे यांनी भेट दिली.

b