शिवप्रहार न्यूज- इस्लाम धर्म स्वीकार असे म्हणत नेवाशाच्या शेखने तरुणीवर केला बलात्कार...
इस्लाम धर्म स्वीकार असे म्हणत नेवाशाच्या शेखने तरुणीवर केला बलात्कार...
नगर - एका विद्यार्थिनीशी मैत्री करून त्यानंतर तिला लॅाजवर नेवुन गुंगीचे औषध कोल्ड्रिंक्स मधुन देऊन, तिच्यावर बलात्कार करून,त्याचा व्हिडिओ बनवून इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर तो व्हिडिओ वायरल करीन अशी धमकी देणारा मुख्य आरोपी जाकीर शाहीन शेख, राहणार- सोनई ,तालुका नेवासा याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
सुपा शहरातील संग्राम लॉज याठिकाणी व नगर शहरातील यशोधन लॅाज या ठिकाणी सदर घटना घडली असून आरोपींवर बलात्कारासह इतर कलमान्वये कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्लाम स्विकारण्याच्या धमकीसोबतच आरोपींनी तरुणीला गर्भनिरोधक गोळी देखील दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.