शिवप्रहार न्युज - १२ वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला १० दिवसांची पोलीस कोठडी…

१२ वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला १० दिवसांची पोलीस कोठडी…
संगमनेर - संगमनेर येथील डॉक्टर अमोल कर्पे याने ०२ दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ग्रामीण भागातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला रुग्णालयाच्या गच्चीवर नेऊन,तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता.
याप्रकरणी संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अटक करण्यात येऊन त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची मोठी पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान तरुणीच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक असून शिवसेना ठाकरे गटातर्फे आरोपीच्या रुग्णालयासमोर निदर्शने देखील करण्यात आले आहे.