शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात आंघोळ करतांना महिलेचा विनयभंग तसेच अल्पवयीन मुलीचा देखील विनयभंग…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात आंघोळ करतांना महिलेचा विनयभंग तसेच अल्पवयीन मुलीचा देखील विनयभंग…

श्रीरामपुरात आंघोळ करतांना महिलेचा विनयभंग तसेच अल्पवयीन मुलीचा देखील विनयभंग…

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरात गोंधवणीरोड परिसरात एका गरीब कुटुंबातील तीस वर्षाची तरुण महिला आंघोळ करत असताना त्या भागातील आरोपी रशीद गरीब शाह याने पत्रा उचकटून न्हाणी मध्ये आंघोळ करत असलेल्या महिलेला पाहत असताना पत्र्याचा आवाज आला.तेव्हा पिडीत महिलेने पाहिले असता आरोपी रशीद शाह हा दिसला महीला जोराने ओरडली तेव्हा तो पळाला.त्यानंतर महिलेने मुलासह रशीदचा बाप गरीब शाह मिर्झा याला घडलेली घटना सांगितली तेव्हा, गरीब शहा याने शिवीगाळ करत रशीद याने तुमची लायकी काय ? तुम्हाला इज्जत नसते ! जातीवादी बोलून विनयभंग केला. तुम्हाला इथून हाकलून देऊ अशी धमकी दिली. 

        तसेच तेथील एका अल्पवयीन आरोपीने पिडीत महिलेच्या १४ वर्षाच्या मुलीसमोर लघवी करून हसून विनयभंग केला व मी कुठेही लघवी करीन,काही करीन असे म्हणून जातीवाचक बोलून धमकावले. मुलगी घाबरली असून ती घराबाहेर जाण्यास घाबरत आहे.पीडीत विवाहित महिलेने शहर पोलिसांतवरील प्रमाणे फिर्याद दिल्यावरून आरोपी रशीद गरीब शाह, गरीब शाह मिर्झा व एक अल्पवयीन सर्व राहणार-गोंधवणी रोड यांच्याविरुद्ध भादवी कलम 354 अ, ब, क, ड, 504, 506, 509 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदाचे कलम 12 , 17 तसेच अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटी कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     या घटनेचे गांभीर्य ओळखत डीवायएसपी बसवराज शिवपुजे, पो.नि. हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. मुख्य आरोपी रशीद शाह याला अटक करण्यात आली आहे.तसेच न्यायालयाने ०४ दिवसांची पोलिस कस्टडी दिली असून पुढील तपास कसून सुरू आहे. या घटनेने गोंधवणी रोड परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे.