शिवप्रहार न्युज - शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या घरावर बुलडोझर;अतिधडक कारवाई...
शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या घरावर बुलडोझर;अतिधडक कारवाई...
शिर्डी (शिवप्रहार न्युज)- काल सोमवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ झालेल्या रस्ता लुटीतून दोन खून व एका खूनाच्या प्रयत्नाने शिर्डीसह परिसर हादरला आहे. सोमवारी पहाटे या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचार्यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या घराची जागा ही अनधिकृत होती आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि प्रशासन पुढील चौकशी करत असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास शिर्डी व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती.