शिवप्रहार न्युज - शिर्डीत दोघांचा भोकसून खून, तीसरा गंभीर; लुटीचा थरार का ?...
शिर्डीत दोघांचा भोकसून खून, तीसरा गंभीर; लुटीचा थरार का ?...
शिर्डी (शिवप्रहार न्युज)- श्री साईबांबाच्या शिर्डीत दोघा जणांची धारधार चाकूने भोकसून हत्या करण्याची घटना घडल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली असून तीसरा गंभीर जखमी असल्याचे समजते. चाकूने वार झालेल्यांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दोघांचा मृत्यु झाला असून खून झालेल्या मयतांची नावे नितिन शेजुळ व सुभाष घोडे असल्याचे समजते. तर जखमीचे नाव कृष्णा दहेकर असल्याचे समजते.
यातील दोघे संस्थांनचे कर्मचारी असल्याची चर्चा आहे. तर ही थरारक घटना लुटीच्या कारणातून घडल्याची प्राथमिक चर्चा असून नेमक्या हत्या का केल्या गेल्या ? कोणी केल्या ? याचीप्राथमिक चौकशी पोलीसांनी सुरु केली असून अप्पर पोलीस अधिक्षक कलुबर्मे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयात जाऊन जखमीची माहीती घेत शिर्डी पोलीसांना तपासकामी मार्गदर्शक सुचना केल्या. डीवायएसपी वमने यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने तिर्थक्षेत्र असलेली बाबांची शिर्डी हादरून गेली आहे.