शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातून गावठी कट्टा खरेदी करून शिर्डीत फिरणारा पकडला…

श्रीरामपुरातून गावठी कट्टा खरेदी करून शिर्डीत फिरणारा पकडला…
श्रीरामपूर/शिर्डी (शिवप्रहार न्युज)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथे गावठी कट्टा बाळगणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद केला. आरोपीकडून गावठी कट्ट्यासह 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांनी पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढून पथक रवाना केले.
पथकाने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत अमोल सिध्दार्थ दिवे, रा. शिर्डी हा गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने कनकुरी रोड, नांदुर्खी रोडवर हॉटेल राजेजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून संशयीत इसमास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने अमोल सिध्दार्थ दिवे रा. गोवर्धननगर, शिर्डी, ता.राहाता असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल, 1,500 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस व 20 हार रुपयाचा एक मोबाईल असा एकुण 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीकडे चौकशी केली असता त्याने हा कट्टा मुजम्मिल हारुन बागवान, रा. श्रीरामपुर याचेकडून खरेदी करुन विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. आरोपी दिवे विरूध्द शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे.