शिवप्रहार न्युज - खंडाळ्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवतांना कारच्या पलट्या; 5 जखमी

शिवप्रहार न्युज -  खंडाळ्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवतांना कारच्या पलट्या; 5 जखमी

खंडाळ्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवतांना कारच्या पलट्या; 5 जखमी

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवतांना कार थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना खंडाळ्याजवळील नांदूर शिवारात घडली आहे. या अपघातात गाडीत बसलेले पाच तरुण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. श्रीरामपूर - बाभळेश्वर रोडवर नांदूर परिसरात एका दुचाकीस्वाराला वाचवताना गाडी खड्डयात पडल्याची घटना घडली. या अपघातात जखमी पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी असल्याचे समजते. तर दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे. 

         अपघातातील जखमींपैकी तिघांवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघे गंभीर जखमी असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.