शिवप्रहार न्युज - नगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. पंकज आशिया…

शिवप्रहार न्युज -  नगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. पंकज आशिया…

नगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. पंकज आशिया…

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारीपदी डॉ.पंकज आशिया यांची नियुक्ती झाली आहे.यवतमाळ जिल्हाधिकारी पदावरून त्यांची नगरला बदली झाली आहे.

       डॉ. पंकज आशिया हे जोधपूर (राजस्थान) येथील मूळ रहिवासी आहेत.त्यांचे वडील डॉक्टर तर आई गृहिणी आहे. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी वडीलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले होते.मात्र त्यांना अपेक्षित असलेली आय.ए.एस.ची रँक मिळाली नव्हती. तिसऱ्या प्रयत्नांत ते आय. ए. एस. झाले. त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्वयंम अभ्यास करून हे यश संपादन केले. 

         आशिया हे २०१६ बॅचचे आय. ए. एस. अधिकारी आहेत. देशात ५६ वी रँक त्यांनी मिळविली आहे. त्यांनी मालेगाव (नाशिक) येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना शहर कोरोनामुक्त करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते.