शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहरात पकडले ११७० किलो गोमांस व ३५ वासरांची सुटका...

श्रीरामपूर शहरात पकडले ११७० किलो गोमांस व ३५ वासरांची सुटका...
श्रीरामपूर- शहरातील वार्ड नंबर ०२ भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ११७० किलो गोमांस मिळाले असून त्याप्रकरणी शाहरुख शेख व वसीम कुरेशी,राहणार-वाड नंबर दोन, श्रीरामपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच वार्ड नंबर ०२ भागातील बाबरपुरा चौकामध्ये सलमान कुरेशी याने 35 वासरे कत्तलीच्या उद्देशाने आणून ठेवली होती.येथील पाण्याच्या टाकीजवळ कारवाई करत पोलिसांनी वासरे ताब्यात घेतली आणि कुरेशीवर देखील गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, डीवायएसपी शिवपुजे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याकडुन करण्यात आली.