शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात "वाइफ स्वॅपिंग" चा प्रकार; नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात "वाइफ स्वॅपिंग" चा प्रकार; नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल...

श्रीरामपुरात "वाइफ स्वॅपिंग" चा प्रकार; नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील एका २९ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या नवऱ्याविरोधात “वाइफ स्वॅपिंग”(बायकांची अदलाबदल) सारखा प्रकार घडविल्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्याद मध्ये म्हटले आहे की,सदर महिलेचा नवरा हा तिला लोणी येथे एका बंगल्यात घेऊन गेला व तेथे एका अष्टगंध लावलेल्या जाड,उंच व्यक्तीच्या घरामध्ये पत्नीला त्याच्यासोबत बळजबरीने शरीर संबंध ठेवायला भाग पाडले.कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी पत्नीला त्याने धमकीही दिली.

          तसेच त्यानंतर गंगापूर येथील एका जोडप्यासोबत सोशल मीडियाद्वारे संपर्क करून त्याच्या पत्नीसोबत पीडित महिलेच्या नवऱ्याने संबंध ठेवले तर पीडित महिलेला त्या पुरुषासोबत संबंध ठेवायला गुंगीच्या औषध देऊन भाग पाडले.श्रीरामपूर शहरातील एका लॅाज मध्ये हे घडले.

         नंतर पुन्हा नवरा असेच करायला सांगत असल्याने वैतागलेल्या ह्या पिडित पत्नीने पोलीस स्टेशन गाठले.या गंभीर प्रकरणाचा श्रीरामपूर शहर पोलीस तपास करीत आहे.या घटनेने अख्या श्रीरामपूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.