शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या इंजिनियर तरूणीची पुण्यात आत्महत्या 

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या इंजिनियर तरूणीची पुण्यात आत्महत्या 

श्रीरामपूरच्या इंजिनियर तरूणीची पुण्यात आत्महत्या 

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुरातील आयटी इंजिनिअर आसलेल्या विवाहीत तरूणीने पुण्यात आत्महत्या करण्याची घटना नुकतीच घडली आहे. त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात शिक्षण घेवून पुण्यातच आयटी क्षेत्रात किंवा इतरत्र नोकरी करणाऱ्यांची नगर जिल्हयातून जाणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. अनेकजण पुण्यातच शिकतात आणि तिकडेच सेटल होतात. अशाचप्रकारे श्रीरामपूरची एक तरूणी आयटी इंजिनिअर झाली. त्यानंतर तिचे दुसऱ्या समाजातील एका तरूणाशी प्रेमसंबंध जुळले. दोघांच्या हट्टापाई दोघांच्या घरच्यांनी मन मोडून त्यांचा विवाह लावून दिला. साधारणपणे दोन वर्षांच्या संसारानंतर नेमके काय झाले याची माहिती मिळू शकली नाही परंतु, नुकतीच या आयटी इंजिनिअर झालेल्या नोकरी करणाऱ्या नवविवाहीतेने पुण्यातच आत्महत्या केली. ही आत्महत्या या नवविवाहीतेने का केली? याचे कारण समजू शकले नाही. परंतु, या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरातील वैवाहीक जीवन हे एक कोडेच असते. त्यामुळे संवाद राहीला नाही किंवा मनासारखे झाले नाही तर त्यातुन अनेकदा नैराश्य येवून त्यातून अनुचित प्रकार अनेकदा घडताना दिसतात. अशा घटनांमुळे पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.