शिवप्रहार न्यूज - राजीनामा दे म्हणत महिला सरपंचाला मारली मिठी...

शिवप्रहार न्यूज - राजीनामा दे म्हणत महिला सरपंचाला मारली मिठी...

राजीनामा दे म्हणत महिला सरपंचाला मारली मिठी...

नगर (शिवप्रहार न्युज)- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका गावातील 27 वर्षे वयाच्या तरुण महिलेला आरोपी अमोल शेळके याने हात धरून म्हणाला की तू सरपंच पदाचा राजीनामा दे असे म्हणत मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी आरोपी समीर पठाण, दिलावर पठाण यांनी सदर पिडीत तरुण महिलेला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भरदिवसा सकाळी 9ः30 वाजता महिलेच्या घरासमोर हा प्रकार घडल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून पीडित महिलेने पाथर्डी पोलिसांत फिर्याद दिल्यावर आरोपी अमोल मिठू शेळके, समीर सायीन पठाण, दिलावर गुलाब पठाण यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354, 504, 506, 34 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.म्हस्के हे पुढील तपास करीत आहे पिडीत महिला सरपंच असल्याचे समजते.