शिवप्रहार न्यूज- टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त;Dy.s.p संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई…
टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त;Dy.s.p संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई…
(प्रतिनिधी): आज दि. 07/02/2022 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला.
आरोपी. क्र.)1) लक्ष्मण बिरसने,रा टाकळीभान, तालुका श्रीरामपूर
45,500/- रु. कि.चे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)
आरोपी. क्र.) 2. शांताबाई जाधव रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर
42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)
आरोपी. क्र.) 3. आशाबाई पवार रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर
36,700/- रु. कि.चे 525 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)
1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)
-----------------------
एकूण 1,28,750/-/- रुपये
वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईचे टाकळीभान येथील महिलांनी Dysp संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे, HC सुरेश औटी, PC नितीन शिरसाठ आदींनी केली.