शिवप्रहार न्यूज- ६ गावठी कट्ट्यासह १२ जिवंत काडतुसे पकडले; एलसीबीची पुन्हा मोठी कारवाई...
६ गावठी कट्ट्यासह १२ जिवंत काडतुसे पकडले; एलसीबीची पुन्हा मोठी कारवाई...
नेवासा (शिवप्रहार न्युज)- जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी नेवासा तालुक्यातील शेखकडून ६ गावठी कट्टे तसेच १२ जिवंत काडतुसं जप्त करत मोठी कारवाई केली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, नगर यांनी पोनि.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, नगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, कुकाणा, ता. नेवासा येथील रेकॉर्डवरील एक आरोपी हा गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत काडतुस विक्री विक्री करण्याचे उद्देशाने घोडेगांव-चांदा रोड, सोनई, ता. नेवासा येथे येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश वारुळे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशांनी मिळून शेतकरी, शेतमजुर असे वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने घोडेगांव- चांदा रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना गळ्यात एक सॅक असलेला बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम दिसला पथकाची खात्री होताच पथक संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला लागलीच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख, वय 34, रा. कुकाणा, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये सहा (06) गावठी बनावटीचे कट्टे व दहा (10) जिवंत काडतूस मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमाकडे गावठीकट्टे व काडतुसा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन चौकशी करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे सहा (06) गावठी कट्टे, दहा (10) जिवंत काडतूस व एक राखाडी रंगाची सॅक असा एकुण 1,56,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोहेकॉ/440 संदीप कचरु पवार, ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. 143/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी नामे कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न व आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. भिंगार कॅम्प 34/2017 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
2. नेवासा 383/2018 भादविक 307, 323, 504, 34 सह आर्म ऍ़क्ट 3/25
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक,नगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.