शिवप्रहार न्यूज- पतसंस्थेत साडेसात कोटीचा अपहार; चेअरमन भाऊसाहेब येवलेसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. राहुरी,श्रीरामपूर,राहत्यात खळबळ
पतसंस्थेत साडेसात कोटीचा अपहार; चेअरमन भाऊसाहेब येवलेसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. राहुरी,श्रीरामपूर,राहत्यात खळबळ
राहुरी/श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- राहुरी तालुक्यातील "राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत साडेसात कोटीचा अपहरण केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये राहुरी, श्रीरामपूर, राहता येथील आरोपींचा समावेश आहे. याप्रकरणी संजय पांडू धनवडे वय-37 धंदा-नोकरी (लेखा परीक्षक सहकारी संस्था) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, राहुरी येथील राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत एकूण 7 कोटी 37 लाख 62 हजार 78 इतक्या निधीचा संस्थेचा विश्वासघात करून फसवणूक करून अपहार केला आहे.
याप्रकरणी धनवडे यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी 1) कारभारी बापुसाहेब फाटक (मॅनेजर) मु. पो. टाकळीमियाँ, ता. राहुरी, जि. अहमदनगर 2) भाऊसाहेब तुकाराम येवले (चेअरमन) मु. पो. राहुरी, नांदुर रोड, ता. राहुरी, जि. अहमदनगर 3) शरदराव लक्ष्मण निमसे (व्हा. चेअरमन)रा.सह्याद्री नर्सरी, नगर मनमाड रोड, अस्तगांव माथा, ता. राहता, जि. अ.नगर 4) सुनिल नारायण भोंगळ (लेखनिक तथा वसुली अधिकारी तथा दैनिक बचत प्रतिनिधी)भोंगळ वस्ती, पाटाजवळ,जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर 5) उत्तम दत्तात्रय तारडे (लेखनिक तथा कॉम्प्युटर ऑपरेटर) मु. पो. केंदळ बु., हनुमान मंदिर जवळ, पुलाजवळ, ता. राहुरी, जि. अहमदनगर 6) श्रीमती सुरेखा संदिप सांगळे (लेखनिक तथा कॅशिअर) प्रगती विद्यालयाजवळ, नीळा झेंडा चौक, राहुरी, जि. अहमदनगर 7) सुरेश मंजाबापु पवार (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक) मु. जोगेश्वरी आखाडा, पो. राहुरी, राहुरी, ता. राहुरी जि. अ.नगर 8) दत्तात्रय विठ्ठल बोंबले (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक)दिपज्योत सह्याद्री पब्लिक स्कुलजवळ, राधामोहन नगर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर, ता. नगर, जि. अ.नगर, 9)दिपक संपतराव बंगाळ (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक) साई प्लाझा, कुंदन पेट्रोल पंपाजवळ, राहता, ता. राहता, जि. अहमदनगर, यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसांनी भादवि कलम 409, 420, 465, 477-अ, 34 प्रमाणे गुर.नंबर 1155/2022 दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहे.या घटनेने खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या आरोपींमध्ये एक आरोपी हा जिल्ह्यातील दोन मोठ्या वृत्तपत्रांमध्ये काम केलेला पत्रकार आहे.