शिवप्रहार न्यूज- पाळणे पुन्हा सुरु करण्याची मागणी…

शिवप्रहार न्यूज- पाळणे पुन्हा सुरु करण्याची मागणी…

पाळणे पुन्हा सुरु करण्याची मागणी…

 श्रीरामपूर -शहराची ओळख व मान असलेला श्रीराम जन्मोत्सव श्रीराम नवमी यात्रा ही हिंदू जनमाणस तसेच श्रीरामपूरकरांच्या भावनेशी तसेच पारंपारिक उत्सवाचा असलेला विषय आहे. सदर यात्रा ही परंपरेनुसार सुरळीत पार पडणे समस्त श्रीरामपूरवासियांची अपेक्षा होती व तशी जबाबदारी देखील प्रशासनाचीच होती.सुरुवातीपासूनच यात्रेच्या नियोजनात येत असलेल्या अडथळ्यांना वेळीच दूर करन योग्य निर्णय घेवून जशी परंपरेने यात्रा भरायची त्याप्रमाणे यात्रा पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनाची होती.परंतु प्रशासनाच्या बेजबाबदारपणा व निष्काळजीपणामूळे यावर्षीची रामनवमी यात्रा बंद पडणे व त्यामध्ये वेळोवेळी व्यत्यय येणे ही दुर्दैवाची बाब आहे. 

      तसेच हिंदू जनमाणस व श्रीरामपूरकरांच्या आस्था व भावनेला तसेच उत्सवाला आहत करण्याचे कृत्य आहे. असे घडण्यास श्रीरामपूरात भरणारी श्रीराम नवमी यात्रा जाणूनबुजून प्रभावीत करण्याचा व परंपरेने चालत आलेली यात्रा यापूढे भरावीच नाही असा प्रयत्न आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने जे काही कारण सांगत यात्रेचे आयोजन बंद पाडले ते दुर्देवी आहेच परंतु श्रीरामपूरच्या जनमाणसाच्या भावना आहत करुन त्यांच्यात संभ्रमावस्थानिर्माण करणारी आहे. प्रशासनाच्या अशा भुमिकेमूळे हे स्पष्ट होते की प्रशासनाला हा प्रश्न उत्तमरित्या हाताळण्यात अपयश आले आहे. यामूळे या दुर्देवी घटनेस जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्याबद्दल जनमाणसात प्रचंड आक्रोश आहे आणि तो या निषेध निवेदनातून व्यक्त होत आहे. समस्त हिंदू समाज व श्रीरामपूर नगरवासिय प्रशासनाच्या या भुमिकेचा निषेध करतो कृपया याची नोंद घ्यावी.