शिव प्रहार न्यूज- आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभेचे आयोजन…
आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभेचे आयोजन…
आळंदी (जिल्हा पुणे) -श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृतीमंदिर, गोपाळपुरा, श्री क्षेत्र आळंदी येथे सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर दुपारी 1 ते 4 या वेळेत वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मसभा आणि अधिवेशनाचे यंदाचे हे 16 वे वर्ष असून यावेळी उत्कृष्ट धर्मकार्य करत असल्याबद्दल राष्ट्रीय वारकरी परिषद नगर जिल्हा समितीचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.
यावेळी श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज, ह.भ.प. संतवीर बंड्या तात्या कराडकर, पूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूरचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदू शक्तीपीठ पालघरचे संस्थापक हिंदू भूषण श्री. श्यामजी महाराज, गोरक्षक गोपालक ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. कारभारी महाराज अंभोरे, भाजप अध्यात्मिक आघाडीचे ह.भ.प. महेश महाराज मस्के, धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर, महाराष्ट्र राज्य, प्रसार प्रमुख आणि राष्ट्रीय वारकरी परिषदेचे समन्वयक ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राज्य प्रसार प्रमुख ह. भ. प. विठ्ठल महाराज अभंग यांसह अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून त्या जमिनी गोमातेसाठी संरक्षित कराव्या, गोवंश हत्या बंदीकायद्याची कठोर अमलबजावणी करावी, सर्व तीर्थक्षेत्री मद्य अन मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशा
1/2 विविध मागण्यांसाठी गेल्या 15 वर्षांपासून वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे हे या वारकरी महाअधिवेशनाचे वैशिष्ठ्य आहे. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.