शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगीरी; लुटमार करणाऱ्या शेख, बागवान पकडले!

श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगीरी; लुटमार करणाऱ्या शेख, बागवान पकडले!
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- अवघ्या चार तासात येथील शहर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक करुन १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अरबाज इजाज बागवान, सर्फराज बाबा शेख असे या आरोपींचे नावे आहे. त्यांच्यावर यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, लासलगाव पोलीस ठाण्यात दोघांवर एकूण 15 गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६) येथील रोहित सचिन मैड हा रात्री ८ वाजेच्या सुमारास रामनगर ते साईनगर कच्चा रस्ता वॉर्ड नं.1 येथुन त्याच्या कडील दुचाकीवर जात असताना त्याला दोन अनोळखी इसमांनी रस्त्यात अडवुन, त्याच्या गळ्याला
धारदार चाकु लावत मारहाण केली. तसेच त्याच्याकडील चांदीची चैन, चांदीचे ब्रेसलेट, ३ हजार रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्डसह त्याची दुचाकी बळजबरीने चोरुन पसार झाले होते.
याप्रकरणी रोहित सचिन मैड याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास येथील शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक जीवन बोरसे हे करीत असताना, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा अरबाज इजाज बागवान (वय-२३, रा.संजयनगर, वॉर्ड नं.२) व सर्फराज बाबा शेख (वय २०, रा.बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं.२) यांनी केला आहे. म्हणुन पो.नि. हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथक रवाना केले. श्रीरामपूर पोलिसांनी सापळा लावुन शिताफिने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना अवघ्या चार तासात पकडले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना दाखल गुन्ह्यात अटक करुन न्यायालयासमोर काल बुधवारी (दि.१८)
हजर केले असता न्यायालयाने आरोपीना पुढील ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडुन लाल रंगाची दुचाकी, ॲपल कंपनीचा आय फोन, १२०० रुपयांची रोख रक्कम, चांदीचे तीन भाराचे चैन व ब्रेसलेट, फिर्यादीचे आधारकार्ड व पॅनकार्ड, एक चाकु असे एकुण १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सुचनेनुसार स.पो.नि. जीवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.कॉ. गौतम लगड, पो.कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ. रमिझराजा अत्तार, पो.कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. भारत तमनर, पो.ना. फुरकान शेख व पो. कॉ. प्रमोद जाधव यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नि. जीवन बोरसे हे करीत आहेत.