शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरातील डबल लव जिहाद प्रकरणी शिवप्रहारच्या मावळ्यांच्या उपस्थित प्रशासनाला निवेदन...
श्रीरामपुरातील डबल लव जिहाद प्रकरणी शिवप्रहारच्या मावळ्यांच्या उपस्थित प्रशासनाला निवेदन...
श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी येथील एका हिंदू समाजाच्या माणसाच्या घरामध्ये दोन लव जिहादसम प्रकार घडले आहेत. सुरुवातीला त्यांच्या पत्नीला एका लव जिहादीने नेले. त्यानंतर त्यांच्या मुलीला काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या एका लव जिहादीने नेऊन तिची विक्री करून तिला गर्भवती केले आणि बुरखा घातला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करण्यात यावी. यासाठी हे निवेदन देण्यात आले. या मुलीला धर्मांतरित कोणी केले, बुरखा कोणी घातला, तिचा विवाह कोणी लावला, तिला गर्भवती कोणी-कोणी केले यात सहभागी असलेला प्रत्येक आरोपी हा रेकॉर्डवर घेण्यात यावा. यासाठी व इतर सर्व मागण्यांसाठी हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे व तहसिल कार्यालय यांना देण्यात आले आहे. तसेच जर या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पिडीत परिवारातील सदस्य व शिवप्रहार प्रतिष्ठान चे प्रमुख मावळे उपस्थित होते.