शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरात माजी नगरसेवकासह ०६ जणांवर गुन्हा दाखल…
श्रीरामपूरात माजी नगरसेवकासह ०६ जणांवर गुन्हा दाखल…
श्रीरामपूर /प्रतिनिधी -श्रीरामपूर शहर परिसरात सासरी नांदत असलेली एक बत्तीस वर्षाची तरुणी हिला माजी नगरसेवक व त्याच्या नातेवाईकांनी तसेच नवऱ्याने वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला.
सासरी नांदत असताना चारित्र्यावर संशय घेऊन ती घरी असताना तिच्या घरात घुसून,तिला धरून,लज्या उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग करून मारहाण केली.तसेच घराच्या बाहेर काढून देऊन शिवीगाळ करत पुन्हा आमच्या घरी आली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
याबाबत पिडीत विवाहित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी संतोष बळीराम चव्हाण, दीपक बाळासाहेब चव्हाण(माजी नगरसेवक),रवींद्र बाळासाहेब चव्हाण, शिवम भाऊसाहेब चव्हाण, राजेंद्र बाळासाहेब चव्हाण,बाळासाहेब काशिनाथ चव्हाण सर्व रा.श्रीरामपूर यांच्या विरुद्ध भा. दं.वि.कलम 143, 452 ,354,498अ,324, 323,504,506 प्रमाणे गुन्हा नुकताच दाखल करण्यात आला असून पो.नि.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना. राशिनकर पुढील तपास करत आहे.
यातील एक आरोपी श्रीरामपूर नगर पालीकेचा माजी नगरसेवक असून एक तलाठी असल्याचे समजते.