शिवप्रहार न्यूज - साईबाबांच्या पवित्र शिर्डीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय उघड ! ६ हॉटेलवर छापा !! शिर्डीत खळबळ !!! DySP मिटकेंचा दणका…

शिवप्रहार न्यूज - साईबाबांच्या पवित्र शिर्डीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय उघड ! ६ हॉटेलवर छापा !! शिर्डीत खळबळ !!! DySP मिटकेंचा दणका…

साईबाबांच्या पवित्र शिर्डीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय उघड ! ६ हॉटेलवर छापा !! शिर्डीत खळबळ !!! 

DySP मिटकेंचा दणका…

शिर्डी (शिवप्रहार न्यूज ) श्री.साईबाबांच्या पवित्र शिर्डीत काही लालची लोक पैसे कमवण्यासाठी या श्रीक्षेत्र असलेल्या ठिकाणी अवैध व्यवसाय अनैतिक व्यवसाय चालवितात. या प्रकरणी श्रीरामपूर विभागाचे डी वाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त खबर मिळाल्यावर त्यांनी अतिशय बारकाईने फिल्डिंग लावून शिर्डीतील अनैतिक अवैध व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीच्या हॉटेलवर छापे टाकले. त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत महिला पुरुषांना पकडण्यात आल्याची माहिती समजली असून छापा टाकल्याबरोबर संपूर्ण शिर्डीत खळबळ उडाली आहे.

        एकंदर ०६ हॉटेलवर छापा टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजली असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ,पंचनामा व पुढील कारवाई आत्ता सध्या सुरू आहे.डीवायएसपी संदीप मिटके यांनी आय जी शेखर पाटील ,एस पी राकेश ओला ,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिर्डीतील मोठी धाडशी कारवाई केल्याचे बोलले जात आहे.शिर्डीच्या श्री साईबाबांच्या पवित्र भूमीत अशा प्रकारे हॉटेलमध्ये गैरकृत्य चालतात हे मागे उघड झाले आहे.मात्र ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी सहा हॉटेलवर छापा टाकण्याचे धाडस प्रथमच करण्यात आले.डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या या कारवाईचे शिर्डीतील बाबांच्या भक्तांकडून स्वागत होत आहे.संबंधित महिलांची नावे, पुरुषांची नावे घेऊन कोणता गुन्हा दाखल होतो याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे !