शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरात ज्यूज पिऊपर्यंत मोटारसायकल चोरली...

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरात ज्यूज पिऊपर्यंत मोटारसायकल चोरली...

श्रीरामपूरात ज्यूज पिऊपर्यंत मोटारसायकल चोरली...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - गाड्या चोरीचे सत्र सुरूच असून आता ज्यूस पेईपर्यंत बाहेर लावलेली मोटारसायकल चोरून नेण्याची घटना श्रीरामपूर शहरात मेनरोडवर घडली आहे. याबाबत, करण पुरूषोत्तम झंवर, वय-२४, धंदा-कृष्णा . कलेक्शन कापडाचे दुकान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. २८ मे रोजी सकाळी ९.३० सुमारास मी आपली मोपेड गाडी नं.एमएच १७ सीजे ०९३० ही घेवून कृष्णा कलेक्शन या दुकानावर गेलो. दुकानातील कामकाजानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास आपण आपली गाडी घेवून शहरातील भगतसिंग चौकात असणाऱ्या लकी ज्यूस सेंटर येथे ज्यूस प्यायला आलो. दुकानासमोर गाडी लावून आपण ज्यूस पिलो. त्यावेळी गाडीला असलेली चावी तशीच राहीलेली होती. १० मिनिटात ज्यूस पिऊन बाहेर आल्यावर मी लावलेल्या ठिकाणी गाडी नव्हती. आजूबाजूला शोध घेतला असता आपली ७० हजार रूपयांची पांढऱ्या रंगाची काळा पट्टा असलेली होन्डा ग्राझिया कंपनीची मोटारसायकल चोरीला गेल्याचे लक्षात आले. सदर फिर्यादीवरून अज्ञात चोराविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.