शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात आमलेट पावची गाडी फोडून चौघांकडून मारहाण...

शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात आमलेट पावची गाडी फोडून चौघांकडून मारहाण...

श्रीरामपुरात आमलेट पावची गाडी फोडून चौघांकडून मारहाण...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूर शहरात आमलेट पावची गाडी फोडून आमलेट पाववाल्याला चौघांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार संगमनेर रोडवर घडला आहे. 

    याबाबत, रविंद्र बळीराम काळंगे, वय - ३५, धंदा-साईलिला आमलेट पाव सेंटर, व्हिआयपी गेस्ट हाऊससमोर, संगमनेररोड, श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रात्री १०.३० वा. आपण आपल्या आमलेट पावच्या गाडीवर असताना त्याठिकाणी मोटारसायकलवर ४ आरोपी आले व त्यांनी लोखंडी रॉडने आपले आमलेट पावच्या गाडीच्या काचा फोडून आपणास मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा काय झालं, आमचं काय चुकलं? असे विचारले असता त्यातील एकाने रॉडने फटका मारून खाली पाडले मला वाचविण्यासाठी आई मध्ये आली असता तिला ढकलून देवून वाईट वाईट शिवीगाळ केली. सदर आरोपींनी हातगाडीवरील अंडे, मसाले, पाव, तेल रस्त्यावर फेकून देत गाडी पलटी करून ते या ठिकाणाहून निघून गेले. 

     सदर फिर्यादीवरून पोलिसांनी सलमान अन्वर बागवान, लतीफ शेख, विकी बैरागी व एक अनोळखी इसम यांच्याविरोधात शहर पोलिसात भादंवि कलम ३२३, ३२४, ३२६, ३४, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोनि.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.