शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात सरकारी कर्मचाऱ्यास ४० हजाराची लाच घेतांना आज रंगेहात पकडले...
श्रीरामपुरात सरकारी कर्मचाऱ्यास ४० हजाराची लाच घेतांना आज रंगेहात पकडले...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहर परिसरात एका पाटबंधारे कर्मचाऱ्यासह तिघांना ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग नगर चे पोलीस उपाधीक्षक श्री.लोखंडे यांच्या पथकाने आज २५ ॲागस्ट रोजी दुपारी सापळा रचून रंगेहात पकडले आहे.या घटनेने सरकारी व पाटबंधारे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांना पाण्यासाठी किती चिरीमिरी द्यावी लागते हे या घटनेतून समोर आले आहे.
एकीकडे दुष्काळी परिस्थितीत पिके जळून चालली अशावेळी पाटाचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी बांधवांकडून कशाप्रकारे पाटबंधारेखात्याचे कर्मचारी लाच घेतात हे या प्रकारातून उघड झाले आहे. चाळीस हजार रुपयाची लाच मागणाऱ्या या पाटबंधारे कालवा निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी रंगेहात पकडले असून याप्रकरणी पुढील कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात येईल असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.
लाचलुचपत पथकाने अंकुश सुभाष कडलग, वय-४२ वर्ष धंदा-नोकरी, कालवा निरीक्षक, वर्ग-३, वडाळा उपविभाग अंतर्गत नॉर्दन ब्रांच, सिंचन शाखा, श्रीरामपूर, जि.नगर रा.बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडी- गुंजाळवाडी, संगमनेर, ता.संगमनेर, अनिस सुलेमान शेख, वय- ३४ वर्ष, धंदा-शेती, (खाजगी इसम) रा.निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि.नगर, संजय भगवान करडे, वय-३८ वर्ष, धंदा-फुल व्यवसाय, (खाजगी इसम) रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर यांना ४० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले असून ताब्यात घेतले आहे.