शिवप्रहार न्युज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारचा निषेध करत पुन्हा फोर व्हीलर जाळली…

शिवप्रहार न्युज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारचा निषेध करत पुन्हा फोर व्हीलर जाळली…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारचा निषेध करत पुन्हा फोर व्हीलर जाळली…

शिऊर बंगला,वैजापूर- वैजापूर, छ.संभाजीनगर परिसरातील हिंदवी जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणी करता सरकारचा निषेध करत त्यांची चार चाकी गाडी शिऊर बंगला चौकामध्ये जाळून तीव्रपणे भावना व्यक्त केल्या.

       तसेच गेल्या अनेक दिवसापासून हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके हे त्यांच्या धर्म पत्नी व इतर सहकारींसह शिऊर बंगला येथे मराठा आरक्षणाच्या व इतर मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत.

       शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या "संभाजीनगर नामकरण मोहीम"या बिगर राजकीय यशस्वी मोहीममध्ये देखील अजय पाटील साळुंके व कट्टर शिवभक्त अतुलभाऊ आढाव यांनी मोलाचे योगदान त्यावेळी दिले होते.