शिवप्रहार न्युज - चोरट्याकडुन ०७ मोटारसायकली हस्तगत,श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी...
चोरट्याकडुन ०७ मोटारसायकली हस्तगत,श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी...
श्रीरामपूर-दिनांक 08/06/2023 रोजी 10/00 वा. चे सुमारास फिर्यादी सोपान जयराम सोनवणे, धंदा- शिक्षक, रा. शिक्षक कॉलनी, खंडाळा परसोड रोड, ता.वैजापुर जि. संभाजीनगर, हे त्यांची एच.एफ. डिलक्स एम.एच. 41, ए.पी. 0766 या मोटारसायकलवर दिनांक 07/06/2023 रोजी सकाळी 10/00 वा. अक्षदा मंगल कार्यालय, श्रीरामपूर येथे लग्नाकरीता आले होते. सदर मोटारसायकल अक्षदा मंगलकार्याला बाहेर लावुन ते मंगलकार्यालयात गेले व 05/30 वा. सुमारास बाहेर आले असात त्यांना त्याची मोटारयाकल दिसुन आली नाही. त्यांनी आजुबाजुला चौकशी केली असता व शोध घेतला असता ती मिळुन आली नाही तेव्हा त्यांची खात्री झाली की त्यांची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इराद्याने स्वतःताच्या आर्थिक फायदयाकरीता चोरुन नेली आहे वगैरेच्या तक्रारी बरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 550/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच पोनि हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास सदर गाडीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा आरोपी नामे गणेश संजय खुरासणे, वय 23 वर्षे, रा.माळवाडगाव ता. श्रीरामपूर, याने केला असल्याचे निष्पण झाल्याने सदर आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर आरोपीचा हा दिनांक 12/09/2023 रोजी वडाळा महादेव परिसरात येणार असल्याची खबर मिळाल्याने सदर ठिकाणी अशोक नगर चौकीचे बिट अंमलदार व पोलीस पथक यांनी सापळा लावुन तो येताच त्यास शिथापिने पकडुन सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने खालील नमुद प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन खालील नमुद वर्णनाच्या चोरी केलेल्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
1)90,000/- रु. किं. ची. हिरो कंपनीची एच. एफ. डिलक्स, तिचा नं. एम.एच 17, सी.वाय, 1305, चेसी. नं. MBLHW2845 D02252 असा असलेली, श्रीरामपूर शहर. पो.स्टे. गुरनं. 891/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा.किं.अं.
2)90,000/- रु.कि.ची किं. ची. हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स, तिचा नं.एम.एच.20 डी.एस. 4824, तिचा चेसी नं. MBLHA11AZF9H04942 असा असलेली विरगाव पो.स्टे (संभाजीनगर ) गुरनं. 202/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा. किं. अं.
3)80,000/- रु.कि.ची.टी.व्ही. एस. स्ट्रार सिटी प्लस, तिचा नं. एम.एच. 17,सी.डी. 1566, चेसी.
नं.MD625FF11J3A31203 असा असलेली विकास दशरत गवळी, रा.मढी खु, कुन्हाडे वस्ती, कोपरगाव जि. नगर. याचे मालकीची. शिर्डी पो.स्टे. गुरनं. 319/2021 भादवि 379 प्रमाणे दाखल गुन्हयात चोरीला
गेलेली.
4)1,1000/- रु.किं.ची. प्लसर 150, ब्लॅक, लाल पट्टा असलेली तिचा घेसी.नं. MD2DHDHZZSCM45485 असा असलेली मुनाफ रियाजउद्दीन शेख, रा. दत्त हॉस्पीटल समोर, जुना बाजाररोड, नगर यांचे मालकीची 5)85,000/- रु. कि.ची बजाज डिक्सव्हर तिचा नं.एम.एच.17, ए.सी. 4132, तिचा चेसी नं.MD2DSPAZZSWF68203 असा असेलेली राजेंद्र एकनाथ वारकड, रा. कान्हेगाव ता. कोपरगाव जि. नगर यांचे मालकीची. 6)55,000/- रु.किं.ची.बजाज प्लसर, ब्लॅक कलर, तिचा नं.एम.एच.27, ए.जी. 9135, चेसी नं.MD2DHDZZRCK59447 असा असलेली, समाधान सिताराम खेडकर, रा. नवापूर खालसा चिंचोली लिंबाजी, संभाजीनगर. याचे
मालकीची.
7780,000/- रु.किं.ची.टी.व्ही. एस. स्ट्रार सिटी, तिचा चेसी.नं.MD625FF1600446 असा असलेली, इफान नसीर शेख, रा. अबिकानगर, कारलेवाडी, ता. राहुरी जि. नगर याचे मालकीची या गाड्यांचा सामावेश आहे.