शिवप्रहार न्युज - रेल्वे अतिक्रमण प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावणार - खा.लोखंडे 

शिवप्रहार न्युज -  रेल्वे अतिक्रमण प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावणार - खा.लोखंडे 

रेल्वे अतिक्रमण प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावणार - खा.लोखंडे 

श्रीरामपूर: - शहरातील नागरिकांना रेल्वे प्रशासनाने अचानकपणे नोटीस पाठवून त्यांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे . खासदार या नात्याने येथील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही याबाबत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्याच्या दालनात बैठक घेऊन त्याचा प्रस्ताव केंद्राकडे स्वतः घेऊन जाणार असल्याचे आश्वासन खा. सदाशिव लोखंडे यांनी दिले.

    घर बचाव कृती समितीच्या वतीने खा.लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. यासाठी आज श्रीरामपूर नगर परिषदेत महसूल व रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सकाळी 11 वाजता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी घर बचाव कृती समितीचे मुख्तार शहा, नागेश सावंत, अशोक बागुल ,नगरसेवक अंजुम शेख, सिद्धार्थ मुरकुटे, राजेश अलघ, प्रकाश चित्ते ,तिलक डुंगरवाल, तोफिक शेख, समाजवादी पक्षाचे जोएफ जमादार, शुभम वाघ, आशिष बोरावके, कलीम कुरेशी ,रज्जाक पठाण, रियाज खान पठाण, रहमान अली शहा, आयुब कुरेशी, जाफर शहा ,दीपक चव्हाण, मेहबूब प्यारे ,मुबारक शेख ,विकास डेंगळे ,युवराज घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते. 

      पुढे बोलताना खा. लोखंडे म्हणाले शिर्डीचा खासदार म्हणून केंद्रामध्ये एक वेगळी ओळख आहे.त्यामुळे रेल्वेचा प्रश्न सुटण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या दालनात नगर विकास ,महसूल ,वनविभाग, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लावून यातून सकारात्मक निर्णय घेऊन कसलेही परिस्थितीत येथील लोकांना विस्थापित होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यासाठी प्राथमिक स्वरूपात आज येथील नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महसूल अधिकारी, रेल्वे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.