शिवप्रहार न्युज - भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटींग(सट्टा) घेणारा आरोपी धरला…

शिवप्रहार न्युज -  भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटींग(सट्टा) घेणारा आरोपी धरला…

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटींग(सट्टा) घेणारा आरोपी धरला…

नगर-श्री.राकेश ओला,अधिक्षक, नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा,नगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की, विशाल आनंद हा पटवर्धन चौक,नगर येथील राहते घरा जवळ काही इसमा सोबत सध्या चालु असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन बेटींग (सट्टा) खेळत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, पोकॉ/रविंद्र घुंगासे, रणजीत जाधव, सागर ससाणे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन, पंचाना सोबत घेवुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.

 पथकाने पंचाना सोबत घेवुन बातमीती नमुद ठिकाणी पटवर्धन चौक, नगर येथे जावुन खात्री केली असता एक इसम मोबाईलचे स्क्रिनवर भारतविरुध्द ऑस्ट्रेलीया क्रिकेटचा सामना सुरु होता व 2 ते 3 इसम गोलाकार बसुन मोबाईल फोनवर बोलताना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच दोन इसम पळुन गेले व एका इसमास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव-गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) विशाल अश्विनकुमार आनंद ,वय 27, रा. पटवर्धन चौक, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता, त्याचे अंगझडतीत 22,500/- रुपये किंमतीचा रोख व मोबाईल फोन मिळुन आल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 1202/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      पुढील कायदेशिर कार्यवाही कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक व श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.