शिवप्रहार न्युज - मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.पवार यांचा राजीनामा; उद्या वडाळा महादेव बंद...

शिवप्रहार न्युज -  मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.पवार यांचा राजीनामा; उद्या वडाळा महादेव बंद...

मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.पवार यांचा राजीनामा; उद्या वडाळा महादेव बंद...

 श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - तालुक्यातील वडाळा महादेव येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ भीमराज प्रतिष्ठानच्या वतीने लाक्षणिक उपोषण तर ग्रामस्थांच्यावतीने उद्या गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी गाव बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या सौ.गीतांजली प्रफुल्ल पवार यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

   मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसापासून उपोषणासाठी बसले आहेत.त्याकरिता वडाळा महादेव ग्रामस्थांनी आरक्षणासाठी व जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी भीमराज प्रतिष्ठानच्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. त्याचबरोबर उद्या दिनांक २ ऑक्टोबर रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

   यावेळी ॲड.सुभाष जंगले, पत्रकार करण नवले, सुरेश कांगुणे व शिवाजीराव भोसले, सलीम वाहेदमिया शेख, सुहास राठोड, सुजित राठोड, दीपक पगारे, बाळासाहेब राठोड, दीपक लोंढे, सोनू राठोड, सुरेश लोंढे, दीपक राठोड, अरुण पवार, सुनील शंकर पवार, सचिन पवार, बापूसाहेब पवार, अविनाश पवार, सुरेश पवार, रामभाऊ कासार, अजित कासार, सर्जेराव कासार, भारत पवार, उत्तमराव पवार, बाबासाहेब पवार, रघुनाथ उघडे, चंद्रशेखर पवार, आप्पासाहेब वाघ, पांडुरंग पवार यांचेसह भीमराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.