शिवप्रहार न्युज - मतदानाच्या अगोदरच सरपंचपदाचे उमेदवार निलेश परदेशींना हद्दपारीची नोटीस…

शिवप्रहार न्युज -  मतदानाच्या अगोदरच सरपंचपदाचे उमेदवार निलेश परदेशींना हद्दपारीची नोटीस…

मतदानाच्या अगोदरच सरपंचपदाचे उमेदवार निलेश परदेशींना हद्दपारीची नोटीस…

 

श्रीरामपूर -तालुक्यातील निमगाव खैरी गावाची ग्रामपंचायत निवडणूक लागलेली असून या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे उमेदवार म्हणून वाघाईमाता ग्राम विकास मंडळाच्या वतीने निलेश परदेशी हे निवडणूक लढवत आहेत.परंतु गावातील राजकीय वातावरण आमच्या बाजुने झाल्याने विरोधकांनी षडयंत्र करून ही नोटीस प्रशासनाला काढण्यास भाग पाडल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

     वाघाई माता ग्रामविकास मंडळाचे दोन सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून सरपंच पदाचे उमेदवार निलेश परदेशी यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे.त्यांचा विजय निश्चित दिसत असल्याने विरोधकांनी हा राजकीय डाव खेळला असल्याचे वागाई माता मंडळाच्या सदस्यांचे म्हणणे आहे.तसेच सरपंच पदाचे उमेदवार निलेश परदेशी यांनी सांगितले की,त्यांच्यावर 2018 पासून कुठलाही गुन्हा दाखल नाही.वागाई माता झेंड्याचे धार्मिक मिरवणुकीचे कार्य व सामाजिक कार्य वाढत असल्याने तसेच निवडणुकीला प्रचंड प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळत असल्याने राजकीय वैमनस्यातून दोन दिवसासाठीची हि तात्पुरती हद्दपारची नोटीस काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

      दरम्यान या प्रकारामुळे निमगाव खैरी गावात राजकीय वातावरण प्रचंड तापल्याचे दिसत आहे.