शिवप्रहार न्युज - दरोड्याच्या तयारीतील श्रीरामपूरचे 6 तर नेवाशातील दोघांसह 11 सराईत आरोपी 8,53,810 ₹ च्या मुद्देमालासह नगर LCB ने केले जेरबंद…
दरोड्याच्या तयारीतील श्रीरामपूरचे 6 तर नेवाशातील दोघांसह 11 सराईत आरोपी 8,53,810 ₹ च्या मुद्देमालासह नगर LCB ने केले जेरबंद…
नगर-नमुद बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा,(Local Crime Branch)नगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोजर शेजवळ, सफौ/बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, विशाल दळवी, विजय ठोंबरे, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, अर्जुन बडे, चापोकॉ/अरुण मोरे यांचे वेगवेगळी पथके नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
नमुद सुचना प्रमाणे पथके आरोपींची माहिती काढत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दिनांक 03/11/2023 रोजी रात्री राहुरी ते अहमदनगर जाणारे रोडवरील शनिशिंगणापुर फाटा या ठिकाणी 10 ते 15 इसम कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या. पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी
शनिशिंगणापुर कडे जाणारे रोडलगत जावुन खात्री करता तेथे टपरीचे आडोशाला अंधारात काही इसम बसलेले दिसले व टपरीजवळ 2 कार, 2 मोटार सायकल, पैकी एका मोटारसायकल जवळ तिन इसम उभे असल्याचे दिसले. सदर ठिकाणी अचानक छापा टाकला असता एका इसमाने मोटार सायकल चालु करुन त्यावर 3 इसम बसुन भरधाव वेगात निघुन गेले. अंधारामध्ये बसलेले उर्वरीत इसम पळण्याचे तयारीत असताना त्यांना योग्य त्या बळाचा वापर करुन ताब्यात घेवुन त्यांना सदर ठिकाणी थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे दिली नाही.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे 1) राहुल किशोर भालेराव वय 23 वर्षे रा. वडाळा महादेव, श्रीरामपुर, 2) संतोष सुखराम मौर्या वय 50 वर्षे रा. गजल हॉटेलसमोर नेवासा, रोड श्रीरामपुर, मुळ रा. लोथा, पो. लंम्भुऑ, जिल्हा फत्तेपुर, उत्तरप्रदेश, 3) सागर विश्वनाथ पालवे वय 27 वर्षे रा. गजानन कॉलनी, अहमदनगर, मुळ रा. मेहेकरी, ता. नगर, 4) बबलु उर्फ दानिश शौकत शेख वय 24 वर्षे रा. वार्ड नं. 01, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, 5) आदिनाथ सुरेश इलग वय 26 वर्षे रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा, 6) रितेश सुरेश दवडे वय 21 वर्षे रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापुर, 7) दिपक महादेव साळवे वय 30 वर्षे रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा, 8) रमेश भाऊसाहेब वाकडे वय 23 वर्षे रा. भोकर, ता. श्रीरामपुर, 9) प्रितमसिंह जगदिपसिंह ज्युनी, वय 23 वर्षे, रा. बालिका हायस्कुल जवळ, वार्ड नं. 03 श्रीरामपुर, 10) मिलींद मोहन सोनवणे वय 29 वर्षे, रा. हरेगांव, ता. श्रीरामपुर, 11) अविनाश कारभारी विधाते वय 27 वर्षे, रा. म्हसोबानगर, घुलेवाडी, संगमनेर, ता. संगमनेर, असे असल्याचे सांगितले. ताब्यातील संशयीतांना पळुन गेलेल्या इसमांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे 12) दादा खंडु गांगुर्डे रा. कात्रड, ता. राहुरी (फरार) 13) शिवाजी मिठु शिंदे रा. कात्रड, ता. राहुरी (फरार) 14) संतोष शेषराव निकम रा.कात्रड, ता. राहुरी (फरार) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये व कब्जात एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस, तलवार,2 सुरे, चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, मिरचीपुड, स्विफ्टकार, अल्टोकार, युनिकॉन मोटार सायकल, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅसटाकी, गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर, रोख रक्कम, 9 विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण 8,53,810/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1243/2023 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 3/25 व 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयीताकडे वरील मिळुन आलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिल्याने खालील प्रमाणे जबरी चोरी, एटीएम चोरीचा प्रयत्न व मंदीर चोरीचे एकुण - 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. राहुरी 1222/2023 भादवि कलम 392, 504, 34
2. संगमनेर शहर 85/2023 भादवि कलम 452, 394, 34
3. सोनई 448/2023 भादवि कलम 379, 427, 511
4. राहुरी 1232/2023 भादविक 380, 511
5. श्रीरामपुर तालुका 561/2023 भादवि कलम 461, 380
6. श्रीरामपुर शहर 172/2023 भादवि कलम 380, 511
7. अकोले 599/2023 भादवि कलम 454, 380
8. संगमनेर तालुका 156/2023 भादवि कलम 379
9. कोपरगांव तालुका 508/2023 भादवि कलम 379
आरोपी नामे राहुल किशोर भालेराव हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व शासकिय कामात अडथळा निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -9 गुन्हे दाखल असुन त्यापैकी 6 गुन्ह्यात फरार आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपूर शहर 160/18 भादविक 461, 34
2. राहुरी 35/19 भादविक 461, 380
3. श्रीरामपूर शहर 13/19 भादविक 353, 332, 504, 506 (फरार)
4. श्रीरामपूर शहर 14/19 भादविक 327, 427 (फरार)
5. एमआयडीसी 250/19 भादविक 392 (फरार)
6. श्रीरामपूर शहर 210/20 भादविक 399, 402 (फरार)
7. श्रीरामपूर शहर 173/20 भादविक 399, 402 (फरार)
8. राहुरी 235/19 भादविक 399, 402 (फरार)
9. गंगापुर, छत्रपती संभाजीनगर 9/22 भादविक 394, 34
आरोपी नामे दानिश ऊर्फ बबलु शौकत शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण - 5 गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. एमआयडीसी 250/19 भादविक 392 (फरार)
2. कोतवाली 5795/20 भादविक 379, 34
3. एमआयडीसी, वांळुज, छत्रपती संभाजीनगर 426/20भादविक 379
4. श्रीरामपूर शहर 824/23 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25
5. श्रीरामपूर शहर 807/23 भादविक 392, 34
आरोपी नामे रमेश भाऊसाहेब वाकडे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जबरी चोरीचा 01 गुन्हा दाखल आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. गंगापुर, छत्रपती संभाजीनगर 9/22 भादविक 394, 34
आरोपी नामे सागर विश्वनाथ पालवे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंगाचा 1 गुन्हा दाखल आहे ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. सोनई 17/19 भादविक 354 (ड), 341, 143, 324 सह पोक्सो 11 व 12
आरोपी नामे आदीनाथ सुरेश इलग हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंगाचा 1 गुन्हा दाखल आहे ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. सोनई 17/19 भादविक 354 (ड), 341, 143, 324 सह पोक्सो 11 व 12
आरोपी नामे संतोष सुखराम मौर्य हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात गंभीर दुखापतीचा 1 गुन्हा दाखल आहे ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपूर शहर 98/10 भादविक 325, 323
आरोपी नामे मिलिंद मोहन सोनवणे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा तयारी व जबरी चोरीचे एकुण 3 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. लोणी 174/15 भादविक 394, 34, 411
2. श्रीरामपूर शहर 88/15 भादविक 394, 34
3. श्रीरामपूर तालुका 98/14 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25
आरोपी नामे अविनाश कारभारी विधाते हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात जबरी चोरी व चोरीचे एकुण 4 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर तालुका 139/16 भादविक 379, 34
2. संगमनेर तालुका 154/20 भादविक 269
3. ओझर, जिल्हा नाशिक 90/23 भादविक 392, 394, 34
4. सिन्नर, जिल्हा नाशिक 289/23 भादविक 392, 34
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व मा. डॉ. श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.