शिवप्रहार न्युज - राजकारणी सुरक्षित ! शेतकरी असुरक्षित !! दिवाळीच्या पूर्वसंध्येला पाथर्डीत शेतकऱ्याचा खून तर नगरमध्ये शेतकऱ्याच्या घरी दरोडा !!
राजकारणी सुरक्षित ! शेतकरी असुरक्षित !! दिवाळीच्या पूर्वसंध्येला पाथर्डीत शेतकऱ्याचा खून तर नगरमध्ये शेतकऱ्याच्या घरी दरोडा !!
नगर ( शिवप्रहार न्यूज ) सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना सर्व राजकारणी पोलीस सुरक्षेत सुरक्षित असताना शेतकरी मात्र आजही असुरक्षितच असल्याचे पुन्हा एकदा धक्कादायक वास्तव समोर आले असून पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवार परिसरात राहणारे शेतकरी कारभारी रामदास शिरसाठ ,वय ५९ हे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये कापसाच्या गोण्याला रात्री राखण म्हणून झोपले होते. तेथे चोरट्यांनी कापूस चोरीचा प्रयत्न केला असता कारभारी शिरसाठ यांनी चोरट्यांना विरोध केला तेव्हा चोरट्यांनी बेदम महाराण करत कारभारी शिरसाट या शेतकऱ्याचा जीवे ठार मारून खून केला.
या प्रकरणी मयत शेतकर्याची पत्नी सुमनबाई कारभारी शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी कलम ३०२ वगैरे प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखत कर्तव्यदक्ष SP श्री.राकेश ओला यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खैरे ,डीवायएसपी पाटील, पोनि आहेर स्थानी गुन्हे शाखा यांनी भेट दिली. पुढील तपास पोनि मुटकुळे करीत आहेत.या घटनेने शेतात झोपणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून घबराट पसरली आहे.कापूस चोरीचे प्रकार घडत आहेत .
दुसऱ्या घटनेत नगर तालुक्यातील वाळूंज येथील शेतकरी हिंगे यांच्या घराचा दरवाजा तोडून आठ ते दहा जण दरोडेखोर घरात घुसले त्यांनी घरातील लोकांना धारदार चाकूने भोकासण्याची धमकी देऊन कपाटातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले.या दागिन्यांची किंमत सुमारे सात लाख रुपये असून रात्री सव्वादोन च्या सुमारास हा प्रकार घडला.या प्रकरणी जनार्दन संभाजी हिंगे या शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसात भादविक कलम ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक खैरे, डीवायएसपी भोसले यांनी भेट दिली.सपोनि देशमुखे दरोडेखोरांचा शोध घेत आहे.
दिवाळीच्या आदल्या रात्री या दोन शेतकरी कुटुंबावर खुन व दरोड्याची घटना घडल्याने शेतकरी व त्याचा शेतमाल सुरक्षित नाही ! आणि राजकारणी पोलिसांच्या सुरक्षेत सुरक्षित ! अशी परिस्थिती समोर आली आहे.जनतेच्या पैशावर राजकारण्यांना सुरक्षा,मात्र शेतकऱ्यांच्या मालाला व शेतकऱ्याला कोणाची सुरक्षा नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.अशा या भयानक दोन घटना दिवाळीच्या पूर्व संधेला घडल्याने खळबळ उडाली आहे .