शिवप्रहार न्युज - चोरीच्या उद्देशाने दिवाळी पूर्वसंध्येला शेतमालकाचा खुन करणारे 3 आरोपी जेरबंद,LCB ची कामगिरी…

शिवप्रहार न्युज -  चोरीच्या उद्देशाने दिवाळी पूर्वसंध्येला शेतमालकाचा खुन करणारे 3 आरोपी जेरबंद,LCB ची कामगिरी…

चोरीच्या उद्देशाने दिवाळी पूर्वसंध्येला शेतमालकाचा खुन करणारे 3 आरोपी जेरबंद,LCB ची कामगिरी…

नगर-नमुद बातमीची हकिगत अशी की, श्रीमती. सुमनबाई कारभारी शिरसाठ वय 55, रा. कडगाव शिवार, ता. पाथर्डी यांचे पती कारभारी रामदास शिरसाठ वय 59 हे त्यांचे घरा जवळ असलेल्या शेतातील पत्र्याचे शेडमध्ये कापसाच्या गोण्याला राखण झोपलेले असताना दि.10/11/23 रोजी रात्री कोणीतरी अनोळखी इसमांनी शेडमधील कापसाच्या 7-8 गोण्या चोरुन नेताना यातील मयत कारभारी यांनी विरोध केला असता अनोळखी आरोपींनी मयतास मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 1148/2023 भादविक 460, 302 प्रमाणे चोरीच्या उद्देशाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        सदर घटना गंभीर स्वरुपाची असल्याने मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

       नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोसई/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संदीप चव्हाण, संतोष लोढे, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/अमृत आढाव, किशोर शिरसाठ व चापोहेकॉ/उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने लागलीच घटना ठिकाणास भेट देवुन परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपी, कापुस विकत घेणारे व्यापारी तसेच मयताचे शेतावरील शेतमजुराबाबत माहिती घेवुन दिनांक 13/11/23 रोजी संशयीतांची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल व बारकाईने विचारपुस करता आरोपी नामे 1) भाऊसाहेब अशोक निकम व 22, रा. लोहगांव, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 2) अशोक संजय गिते वय 23, 3) श्रीकांत रावसाहेब सुर्यवंशी वय 20, दोन्ही रा. कडगांव मिरीरोड, ता. पाथर्डी यांनी त्यांचा साथीदार नामे करण अजिनाथ कोरडे, रा. कडगांव, ता. पाथर्डी (फरार) याचेसह मयत कारभारी शिरसाठ यांचे शेतावर जावुन पत्र्याचे शेडमधील कापसाच्या गोण्या चोरुन नेताना कारभारी शिरसाठ हे झोपेतून उठल्याने व त्याने आरोपींना ओळखल्याने मयताचे नाक व तोंड दाबुन जिवे ठार मारल्याची कबुली दिल्याने आरोपींना ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पो.स्टे. करीत आहे.

       आरोपी नामे अशोक संजय गिते हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यामध्ये चोरी, व दुखापतीचे खालीलप्रमाणे - 06 गुन्हे दाखल आहेत. 

अ. क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. पाथर्डी 336/2018 भादवि कलम 324, 143, 147, 148, 149

2. गेवराई, जि. बीड 232/2020 भादवि कलम 379

3. गेवराई, जि. बीड 153/2020 भादवि कलम 379

4. गेवराई, जि. बीड 196/2020 भादवि कलम 379

5. शिरुर जि. पुणे 1005/2021 भादवि कलम 379

6. सुपा 13/2022 भादवि कलम 379

         सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.