शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात ३००० गोवंश जनावरांची कातडी पकडली...

श्रीरामपुरात ३००० गोवंश जनावरांची कातडी पकडली...
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)-महाराष्ट्र सरकारने गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी करून कायदा केलेला असतानाही कायदा पायंदळी तुडवत श्रीरामपूर शहरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री केल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून धक्कादायक बाब म्हणजे अनेक गोवंश जनावरांची कत्तल करून ठार मारल्यानंतर त्यांची कातडी एका ट्रकमध्ये भरताना पोलिसांनी पकडले. गोडाऊनमध्ये देखील गोवंश जातीच्या जनावरांची कातडी मिळून आली आहे. या दोन्ही ठिकाणाहून जप्त केलेल्या तब्बल 3000 गोवंश जातीच्या जनावरांच्या कातडीची किंमत तब्बल 15 लाख रूपये आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिल्या घटनेत वॉर्ड नं. 2, नवी दिल्ली, धनगर वस्ती परिसरातील पत्र्याच्या गोदामात अशोक लेलंडचा ट्रक नं.एमएच 16 टी 3399 हिच्यात गोवंश जनावरांचे ठार मारून उरलेले चामडे अवैधरित्या साठवणूक करून ट्रकमध्ये भरताना भर दुपारी आढळून आले. याप्रकरणी पोकॉ.धनंजय वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजू निसार सय्यद, वय-33, रा.जेऊर बायजाबाई, ता.नगर, दानिश जावेद बागवान, वय-18, रा.वॉर्ड नं.2, सुभेदारवस्ती, फारूक सुलेमान कुरेशी, वय-45, रा.सुभेदारवस्ती, वॉर्ड नं.2, बाबु सय्यद, रा.जेऊर, ता.नगर यांच्याविरूद्ध भादंवि कलम 429 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5(सी), 9, 9(1) प्रमाणे गुरनं. 1246 दाखल करण्यात आला असून दुसरी फिर्याद पोना.भैरवनाथ अडांगळे यांनी दिल्यावरून आरोपी अश्पाक उर्फ आशु फरीद कुरेशी, रा.वॉर्ड नं.2, श्रीरामपूर याच्याविरूद्ध भादंवि कलम तसेच महाराष्ट्र प्राणीसंरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5(अ)(ब)(क), 9(अ) प्रमाणे गुरनं. 1245 दाखल करण्यात आला असून पोना.अडांगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, वॉर्ड नं. 2, कुरेशी मोहल्ला, उर्दू शाळेजवळ एका दुकानाच्या आडोशाला गोवंश जनावरांचे कत्तल करून कत्तल केले मांस विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदा बाळगताना मिळून आला. पोनि. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सोळंके व हेकॉ. शेख हे पुढील तपास करीत आहेत.