शिवप्रहार न्युज - नेवाशात कत्तलीसाठी आणलेले 27 गोवंश,700 किलो गोमांस व वाहने असा एकुण 4,10,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त;LCB ची धडाकेबाज कारवाई.
नेवाशात कत्तलीसाठी आणलेले 27 गोवंश,700 किलो गोमांस व वाहने असा एकुण 4,10,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त;LCB ची धडाकेबाज कारवाई.
नगर-श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा,नगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/सोपान गोरे, मनोहर शेजवळ, सफौ. राजेंद्र वाघ, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, पोना/राहुल सोळुंके, विशाल दळवी, पोकॉ/मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
त्यानंतर वरील पोलीस पथक अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नाईकवाडी मोहल्ला नेवासा, ता. नेवासा, जि.नगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करुन गोमांस विक्री करीत असलेबाबत बातमी मिळाल्याने सदर बातमी ठिकाणी जावुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने पोलीस पथकाने नेवासा या ठिकाणी जावुन नेवासा पोलीस स्टेशनचे पोउपनि/संदीप ढाकणे, पोना/एस. के. धोत्रे, पोकॉ/खंडागळे, करंजकर यांना मदतीला घेवुन बातमीतील ठिकाणी नाईकवाडी मोहल्ला, नेवासा येथे जावुन खात्री करता सदर ठिकाणी 700 किलो गोमांस तसेच कत्तलीसाठी आणलेले 27 गोवंश जातीची जनावरे विनाचारा पाण्याचे बांधलेले दिसुन आले.
सदर ठिकाणी असलेल्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नांव गावे विचारता त्यांनी त्यांची नावे 1) कैफ मुश्ताक शेख वय 45 वर्षे, 2) रफिक नुर मोहंमद शेख वय 45 वर्षे, 3) रियाज कादर चौधरी वय 28 वर्षे, सर्व रा. रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा, ता. नेवासा, 4) राजु अकबर कुरेशी वय 30 वर्षे, रा. सिल्लेखाना, छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. तसेच सदर एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आलेले आहे.
सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जात 1,40,000/- रुपये किमतीचे 700 किलो गोमांस, 27 लहान मोठी गोवंशीय जनावरे, लोखंडी सुरा, वजनकाटा असा एकुण 4,10,100 /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बाबत पोहेकॉ/1733 अतुल भानुदास लोटके याचे फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु. र. नं. 1121/2023 भादवि कलम 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5, 5 (अ), (ब)(क), 9 (अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई पोलीस करीत आहे.
आरोपी नामे राजु अकबर कुरेशी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालीलप्रमाणे - 03 गुन्हे दाखल आहेत.
अ. क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. क्रांती चौक 253/2020 भादवि कलम 188, 269
2. क्रांती चौक 103/2020 भादवि कलम 188 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (ब)
3. क्रांती चौक 10/2022 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (ब)
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला,पोलीस अधीक्षक, नगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.