शिवप्रहार न्युज - विषारी गवतामुळे दिघी येथील शेतकऱ्याच्या ०५ गाई दगावल्या…
विषारी गवतामुळे दिघी येथील शेतकऱ्याच्या ०५ गाई दगावल्या…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहराजवळील दिघी गावातील शेतकरी अक्षय वाणी यांच्या ०५ गाई विषारी गवत खाल्ल्यामुळे काल दगावल्याची घटना घडली आहे.विषारी गवत खाल्ल्यामुळे या गाईंचे पोट फुगले असता त्यावर पशुवैद्यकीय डॉक्टर सानप यांनी उपचार देखील केले.परंतु या पाच गाई वाचू शकल्या नाहीत.
या गाई दगावल्यामुळे अक्षय वाणी यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.कर्ज काढून त्यांनी गाई खरेदी केल्या होत्या.तरी शासनाकडून त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.