शिवप्रहार न्युज - गळनिंब येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी जेरंबद 

शिवप्रहार न्युज -  गळनिंब येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी जेरंबद 

गळनिंब येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी जेरंबद 

नेवासा- प्रस्तुत बातमीची हकिगत अशी, फिर्यादी श्री प्रमोद संभाजी कापसे वय 24 वर्षे, रा. सुरेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांचा मित्र प्रविण सुधाकर डहाळे वय 24 वर्षे, रा. गळनिंब, ता. नेवासा यास आरोपी नामे 1) शेखर अशोक सतकर, 2) माऊली उर्फ अरुण दत्तात्रय गणगे 3) अशोक उर्फ खंडु किसन सतकर सर्व रा. सुरेगांव, ता. नेवासा,4) दिपक सावंत पुर्ण नांव माहित नाही. रा. अहमदनगर, 5) ईश्वर पठारे रा. वरखेड, ता. नेवासा, 6) जालींदर बिरुटे रा. सदर, व इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी मागील भांडणाचे कारणावरुन तलवार, कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करुन जिवे ठार मारले. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 1028/2023 भादवि कलम 302, 307, 143, 147, 148, 149 सह आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

      सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री. राकेश ओला , पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करणेकामी पथक नेमुण समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

 नमुद आदेशान्वये पोनि/