शिवप्रहार न्युज- कर्जबाजारीपणा व सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या...
कर्जबाजारीपणा व सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील प्रगतीशील शेतकरी वसंतराव मुरलीधर वाणी,तंटामुक्ती अध्यक्ष यांचे चिरंजीव कै.बाळासाहेब वसंतराव वाणी यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून दि.१८/१२/२०२३ रोजी सायं.८.०० वा.आत्महत्या केली. त्यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रची पाच लाख रुपये थकबाकी होती.त्यांनी इतर नातेवाईकाकडून काही पैसे जमा करून बँक ऑफ महाराष्ट्रची थकबाकी भरलेली होती. तसेच खाजगी सावकार व्यक्तीकडून १५ ते २० टक्क्यापर्यंत व्याजाने रक्कम घेतलेली होती.
त्यातच मागील वर्षी अज्ञात व्यक्तीने त्यांचा दोन ते तीन एकर पिकवलेला हरभरा पेटवून दिला. तसेच सोयाबीन पीकही पावसाअभावी वाया गेले. त्यांच्या पत्नीचा आणि वडिलांना पेंरालिसीसच्या विकारामुळे दवाखान्यात होणारा खर्च अधिक होता. हा सर्व खर्च आणि कर्ज हे उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने या सर्व प्रकारच्या त्रासाला व सावकाराच्या तगाद्याला कंटाळून बाळासाहेब वाणी यांनी आत्महत्या केल्याची नातेवाईकांमध्ये चर्चा आहे.