शिवप्रहार न्युज - FyBSC च्या विद्यार्थिनीला वार्ड नं.०७  मधून फूस लावून पळवलेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्युज -  FyBSC च्या विद्यार्थिनीला वार्ड नं.०७   मधून फूस लावून पळवलेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

FyBSC च्या विद्यार्थिनीला वार्ड नं.०७ 

मधून फूस लावून पळवलेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. शहरातील वॉर्ड नं.७, सरस्वती कॉलनी परिसरात ही मुलगी राहते. ती FyBSC मध्ये शिक्षण घेते. दि. १७ डिसेंबरला सायं. ५.३० च्या दरम्यान सदर मुलगी घरातून अचानक गायब झाली. कोणीतरी तिच्या अज्ञानाचा फायदा घेवून ,तिला फूस लावून, तिला पळवून नेल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

      या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.