शिवप्रहार न्युज - लग्न झालेल्या बाईला नवरी भासवून, बनावट लग्न लावुन देणारी टोळी लोणी पोलीसांकडुन जेरबंद…

शिवप्रहार न्युज - लग्न झालेल्या बाईला नवरी भासवून, बनावट लग्न लावुन देणारी टोळी लोणी पोलीसांकडुन जेरबंद…

लग्न झालेल्या बाईला नवरी भासवून, बनावट लग्न लावुन देणारी टोळी लोणी पोलीसांकडुन जेरबंद…

लोणी/कोल्हार -दि. 30/11/2023 रोजी पूर्वी एक महीना ते दि. 23/12/2023 रोजी स. 11/00 वा. चे दरम्यान भगवतीपुर ता. राहता येथे आरोपी महीला 1) नामे रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण 2) रोहिणी कैलास गायकवाड 3) दिपीका प्रविण कांबळे सर्व रा. बदलापुर बेलवली ता. अमरनाथ जि.ठाणे 4) पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतिष बाबासाहेब शिंदे रा. तिळवणी ता. कोपरगाव 5) अनिता संतोष चंदनशिवे 6) संतोष फकिरा चंदनशिवे 7) राममल राठोड 8) संगिता घुले सर्व रा. छत्रपती संभाजीनगर यांनी संगणमत करुन यातील फिर्यादीचा मुलगा मयुर दशरथ गायकवाड यांचे लग्न करण्यासाठी मुलगी दाखवितो असे म्हणुन मध्यस्थ आरोपी पुंडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे यांनी आरोपी दिपीका प्रविण कांबळे हीचे लग्न झालेले असतांना ती नवरी आहे असे भासवुन फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड यांचे कडुन लग्न लावण्यासाठी रुपये 3,20,000 / रुपये घेतले व फिर्यादीचे सदर गुन्हयांतील फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड, वय 53 वर्ष रा. भगवतीपुर ता. राहता यांचे मुलांशी लग्न लावुन देवुन त्यांची फसवणुक केली आहे.    

      सदर बाबत यातील फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड रा. भगवतीपुर ता. राहता यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन लोणी पोलीस स्टेशन /-776/2023 भा.द. वि.कलम 420,418,406,417,120 (ब), 34 प्रमाणे दि. 23/12/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हयांचे तपास अनुसंधाने सपोनि युवराज आठरे, पोसई योगेश शिंदे, पोसई आशिष चैधरी, पोहेका/1582 दिनकर चव्हाण, पोना/1235, रविंद मेढे, पोना 1179 गणेश आंडागळे, पो.कॉ. 2676 मच्छिद्र इंगळे, मपोका/1950 जयश्री सातपुते, मपोका/2365 मनिषा गिरी लोणी पो, स्टे. येथील पोलीस तपास पथक यांनी सदर गुन्हया चा तपास करता मिळालेल्या गुप्त बातमीदार सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन तपास पथकांनी ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता आरोपी पुडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे याने लग्न लावण्यासाठी मध्यस्थ केली होती त्या बदल्यात एकुण 26000 /-रुपये घेतले ते सदर गुन्हयांत जप्त केले आहे.सदर गुन्ह्यांतील आरोपी महीला नाम 1) रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण 2) रोहिणी कैलास गायकवाड 3) दिपीका प्रविण कांबळे सर्व रा. बदलापुर बेलवली ता. अमरनाथ जि. ठाणे 4) पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतिष बाबासाहेब शिंदे रा. तिळवणी ता. कोपरगाव यांना जेरबंद केले आहे.व दि.30/12/2023 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.

आरोपी नं. 4 सतिष बाबासाहेब शिंदे रा. तिळवणी ता. कोपरगाव जि. अहमदनगर

1) लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 776/2023 भा.द.वि. कलम 420,417,418,406,120 (ब),34 

2)विरगाव पोलीस स्टेशन ता. पैठण गु.रनं. 276/2023 भा.द.वि. कलम 420,34

3) रमजावनपुरा पो.स्टे. ता. मालेगाव गु.र.नं. 56/2022 भा.द.वि. कलम 420, 34

      सदरची कारवाई ही मा. श्री राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. स्वाती भोर, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. श्री संदिप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोसई योगेश शिंदे, पोसई आशिष चैधरी, पोहेका/1582दिनकर चव्हाण, पोना / 1235, रविंद मेढे,, पो.कॉ. 2676 मच्छिद्र इंगळे पोना । 179 गणेश आंडागळे, मपोका/1950 जयश्री सातपुते, मपोका/2365 मनिषा गिरी या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.