शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात 2250 किलो गोमांससह टेम्पो पकडला...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात 2250 किलो गोमांससह टेम्पो पकडला...

श्रीरामपुरात 2250 किलो गोमांससह टेम्पो पकडला...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील काझीबाबा रोड, कुरेशी मोहल्ला पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी पाहटेच्या सुमारास पोलिसांनी 2250 किलो गोवंशीय जनावरांच्या मांसासह टेम्पो पकडला असून अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी कुरेशीवर गुन्हा दाखल केला आहे.

   याबाबतची माहिती अशी, काल शनिवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकाने काझीबाबा रोड, कुरेशी मोहल्ला पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकला असता ग्रे रंगाचा अशोक लेलंन्ड कंपनीचा टेम्पो (एम. एच.०६ बी.जी.४६१३) मध्ये ४,५०,००० रुपये गोवंशीय जातीचे जनावरांचे 2250 किलो (सव्वा दोन टन) मांस आढळून आले. या प्रकरणी महमंद अजीज कुरेशी यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे सुधारित कायदा सन २०१५ चे कलम ५, ५ (अ) (ब), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करत अकारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, यांच्या पथकातील पोलिस उपनिरिक्षक समाधान सोळंके, हवालदार शफिक शेख, पोलिस नाईक रघुवीर कारखेले, भैरवनाथ अडागळे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, शिवाजी बडे, संभाजी खरात, यांनी केली. पुढील तपास पोलिस नाईक भैरवनाथ अडागळे हे करीत आहेत.