शिवप्रहार न्युज - आरक्षणासाठी शिंपी समाजाने दक्ष रहावे;अरविंद गुजर,तेजस गायकवाडचा समाजातर्फे गौरव…

शिवप्रहार न्युज - आरक्षणासाठी शिंपी समाजाने दक्ष रहावे;अरविंद गुजर,तेजस गायकवाडचा समाजातर्फे गौरव…

आरक्षणासाठी शिंपी समाजाने दक्ष रहावे;अरविंद गुजर,तेजस गायकवाडचा समाजातर्फे गौरव…

श्रीरामपूर : ओ.बी.सी. आरक्षणाबाबत शिंपी समाजाने दक्ष रहावे असे आवाहन संत नामदेव महाराज समाजोन्नती परिषदेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरविंद गुजर यांनी केले आहे. श्रीरामपूर येथील शिंपी समाजातील युवा उद्योजक तेजस गायकवाड याने नुकतेच श्रीक्षेत्र पंढरपूर ते पाकिस्तान अशी २४०० किलोमीटरची सायकल यात्रा २२ दिवसात पूर्ण करून परतले. यानिमित्त त्यांचा संत नामदेव महाराज मंदिरात शिंपी समाज पंच मंडळ व संत नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. याप्रसंगी गुजर बोलत होते.परिषदेचे मार्गदर्शक नामदेवराव भुसे अध्यक्षस्थानी होते. 

      परिषदेचे नूतन जिल्हाध्यक्ष शैलेश धोकटे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास खंदारे, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व भाजपचे शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, शंभू वसतिगृहाचे अधीक्षक अशोक दिवे सर, पंच मंडळाचे अध्यक्ष सुनील खांबेकर, श्रीधर गायकवाड, संतोष गायकवाड, किरण भांबारे, राजेंद्र लचके, विनायक देव्हारे, श्याम सारंगधर, दत्तात्रय भांबारे, नरेंद्र लचके, अण्णा पतंगे, सोमनाथ तुपसाखरे, सुनिल हांगेकर, सचिन सारंगधर, किरण देव्हारे, कृष्णा वावधने, यांची प्रमुख उपस्थिती होती. शीख धर्मगुरू ग्यानी अनोखसिंग मस्कीन यांच्या हस्ते गायकवाड यांना गौरविण्यात आले. गुरू ग्रंथसाहिब या ग्रंथामध्ये संत नामदेव महाराज यांच्या कार्याचा गौरवशाली उल्लेख असल्याचे मस्कीन यांनी सांगितले. यावेळी गायकवाड यांचे वडील संतोष गायकवाड व आई शिल्पा. गायकवाड यांचा ही सत्कार करण्यात आला.

      तेजस यांनी सायकल यात्रेचे अनुभव कथन करताना समाजबांधवांनी मुख्य प्रवाहात अधिक सक्रीय होण्याचे आवाहन केले. तेजस यांनी मोठे धाडस करून, नैसर्गिक संकटांचा सामना करीत २२०० कि.मी. सायकल यात्रा पूर्ण करून श्रीरामपूरचे नाव उंचावले आहे, असे मिलिंदकुमार साळवे म्हणाले. यावेळी भुसे, धोकटे, खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनिल हांगेकर यांनी सूत्रसंचालन केले. संत नामदेव महाराजांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.तेजस व त्यांचे सहकारी सायकल पालखी यात्रेद्वारे पंढरपूर ते घुमान (पंजाब) पोहोचले, तदनंतर पाकिस्तान मधील करतारपूर येथील गुरुद्वारास त्यांनी भेट दिली.

      संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी दिन आणि शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांचा ५५४ वा प्रकाश पर्व जयंतीनिमित्त या यात्रेचे आयोजन केले होते.ही यात्रा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, हरयाणा मार्गे पंजाब राज्यातील श्रीक्षेत्र घुमानमध्ये पोहचली. भागवत धर्म प्रसारक समितीचे वेळापूर येथील अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी काढलेल्या धार्मिक व आध्यात्मिक सायकल वारीत सहभागी भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार समिती (घुमाण) आणि विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने देशभरातील शांतता, समता आणि बंधुत्वाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आला.