शिवप्रहार न्युज - जय श्रीराम..जय श्रीराम...च्या जयघोषात श्रीरामपूरची श्रीरामनवमी यात्रा उत्साहात सुरु...
जय श्रीराम..जय श्रीराम...च्या जयघोषात श्रीरामपूरची श्रीरामनवमी यात्रा उत्साहात सुरु...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर चे ग्रामदैवत प्रभु श्रीराम मंदिरात आज दुपारी १२ वाजता मोठ्या भक्ती भावाने जल्लोशात जय श्रीराम.. जय श्रीराम...चा जयघोष करत श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला आणि श्रीरामपूरची प्रसिध्द अशी श्रीरामनवमी यात्रा आजपासून सुरु झाली.
विविध क्षेत्रातील प्रमुख मंडळी, महीला भावीक, श्रीरामभक्त नागरीकांनी श्रीराम मंदिरात प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सितामाई, महाबली हनुमान यांच्या दर्शनासाठी एकच गर्दि केली आहे. परंपरागत वाजत गाजत भगवा ध्वजाची अनेक ठिकाणांहून मिरवणूक श्रीराम मंदिरावर आली आणि भगवा ध्वज मंदिरावर चढविण्यात आला. यावार्षी श्रीरामनवमी यात्रेचे ९५ वे वर्ष असून सायंकाळी श्रीरामांच्या मुर्तीची सजवीलेल्या रथातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
मेनरोडवर दुकाने सजली असून थत्ते मैदानवर पाळणे आले आहेत. यात्रा उत्सव भव्यदिव्य होण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यात्रा उत्साहात शांततेत सुरु झाली आहे.