शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात ज्याला नेत्यांनी फिरवला बनवून महान ऋषीमुनी; तो निघाला कोल्हापुरातील तरुण हिंदू मुलीचा खुनी...
श्रीरामपुरात ज्याला नेत्यांनी फिरवला बनवून महान ऋषीमुनी; तो निघाला कोल्हापुरातील तरुण हिंदू मुलीचा खुनी...
श्रीरामपूर-(शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या नवरात्रीला मेन रोडवरील एका मंडळाने लाखो खर्चुन बाबाला घटछातीवर घेण्यासाठी बोलावले होते. महान ऋषिमुनी असल्याचे भासवून त्याचे शहरभर फ्लेक्स लागले होते. तो भोंदू बाबा बालयोगी महेश्वरानंद उर्फ महेश अर्जुन माने, रा.नृसिंहसमर्थमठ, देवठाणे, ता.पन्हाळा, कोल्हापर हा बाबा ओरीजनल भोंदू बाबा निघाला आहे. कोल्हापुरातील एक हिंदू मुलगी वैष्णवी पवार हिच्या खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी निघाला आहे. यामध्ये बाबाचा भाऊ बालयोगी महाराज उर्फ श्रीकृष्ण अर्जुन माने, संतोष आडसुळे, प्रशांत उर्फ नाण्या शेवडे, श्रीधर पवार याच्यासह एकुण 8 जण आरोपी आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 187 / 2024 कलम 302,120-ब,108,109, 34 प्रमाणे हा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. दोन्ही भोंदू बाबा बंधू फरार झाले आहेत.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की , वैष्णवी लक्ष्मीकांत पवार ही मुलगी ह्या बालयोगी महाराजाच्या कोल्हापुर येथील मठामध्ये सेवेकरी होती. एका नाजूक कारणावरून भडकून जावुन या दोन्ही भोंदू बाबा व त्यांच्या साथीदारांनी मिळून वैष्णवी या हिंदू मुलीचा खून केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी भोंदू बाबा तथाकथित बालयोगी महेश्वरानंद उर्फ महेश अर्जुन माने याने गुन्ह्यांत वापरलेली नेवाशातील चारचाकी गाडी कोल्हापूर पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. सदर गुन्ह्याचा तपास नगर जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या नांग्या ठेचणारे तत्कालीन नगर LCB PI व सध्या लक्ष्मीपुरी पो.ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पवार हे करत आहे.
दरम्यान श्रीरामपुरात या भोंदू बाबाने नवरात्रमध्ये पोटावर घट चे ताट घेऊन हा बाबा मेनरोडच्या एका नव्याने सुरु झालेल्या राजकीय नवरात्रोत्सव मंडळामध्ये बसला होता. त्यावेळेस हिंदू धर्मावर निष्ठा असणाऱ्या अनेक भाविक भक्तांनी, महिलांनी भक्ती भावाने त्याचे दर्शन घेतले. अनेकांनी त्याला घरी बोलावले घरातील माय-माऊलीला या भोंदु बाबाला ओवाळायला लावले. परंतु खरोखर हा भोंदू बाबा त्या लायकीचा होता का ? तसेच त्याने देवीच्या घटाचे पात्र देखील रात्री काढून ठेवल्याची त्यावेळेस काही प्रत्यक्षदर्शीमध्ये चर्चा झाली होती.
श्रीरामपुरात ह्या भोंदू बाबाला आणून सर्वसामान्य हिंदू भाविक भक्तांची दिशाभूल करण्यामध्ये श्रीरामपूरच्या “अण्णा” गटाचा हात आहे. हा अण्णा सत्ताधारी पक्षाचा अतिप्रमुख कार्यकर्ता असून याला हिंदुत्वाचा अजिबात गंध नाही. तरी हा सत्तेतील हिंदुत्वादी पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता झाला आहे. श्रीरामपूरच्या या अण्णाचे अनेक “नाजुक साजुक” कारनामे शहरात चवदारपणे चर्चिले जातात. वयाचे भान न ठेवता या अण्णाने “गन्ना लावुन” अनेकांना चुना देखील लावला आहे. अशा कारनाम्यांसोबत याने प्रामाणिकपणे हिंदुत्ववादी कार्य करणाऱ्या, लव जिहाद विरोधात रस्त्यावर उतरून मोर्चात सहभागी होणाऱ्या, लव जिहाद मधुन हिंदू लेकी-बाळींचे रक्षण करणाऱ्या, गोरक्षा करणाऱ्या सच्चा शिवभक्तांना या अण्णाने प्रशासनाला हाताशी धरून तडीपारीचे आदेश काढायला लावले. काही हिंदुत्ववाद्यांना जेलात पाठवण्याची सोय केली.
दुसरीकडे श्रीरामपुरातील गुन्हेगारीला बळकटी देवुन सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना वेठीस धरणाऱ्या व असे विविध कारनामे करणाऱ्या ह्या अण्णावर कारवाई करण्याची मागणी पक्षाकडे करणार असल्याचे या हिंदुत्ववादी पार्टीच्या एका गटा सांगितले आहे. तसेच प्रदेशाध्यक्षाकडे तशी रितसर तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्याचे इतरही कारनामे नजीकच्या काळात उघड होण्याची शक्यता आहे.
एका भोंदू बाबाला हिंदू भाविक भक्तांसमोर आणुन तो एक तपस्वी, योगी असल्याचे दाखवून भक्तांची दिशाभूल करणाऱ्या ह्या अन्नाची हिंदुत्ववादी पक्षाचा पदाधिकारी म्हणून हातकलपट्टी होणे गरजेचे आहे. तसेच श्रीरामपुरात अशी चर्चा आहे कि, हा अण्णा नेमका विंचवासारखा “महादेवाच्या पिंडीवर” जाऊन बसला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात बोलायला कोणी धजवत नाही. परंतु त्याने जर हिंदुत्वाला, शिवकार्याला बदनाम करणे थांबवले नाही तर त्याच्याविरोधात यापेक्षा जहाल पद्धतीने आवाज उठवणार असल्याची भावना एका कट्टर शिवभक्ताने व्यक्त केली आहे.