शिवप्रहार न्युज- श्रीरामपूर शहरात तरूणाचा गळफास...
श्रीरामपूर शहरात तरूणाचा गळफास...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती परिसरात आज सोमवारी पहाटे एका तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोरगेवस्ती येथील जनता हायस्कूल पाठीमागील भागामध्ये राहणारा अमित रजपूत, वय-२२ या तरूणाने आज सोमवारी पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. अमित याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली ? याबाबत माहिती समजू शकली नाही. अमित हा काही दिवसांपूर्वीच मोरगेवस्ती येथे राहण्यास गेला होता. पूर्वी तो बेलापूर रोडवरील पुर्णवादनगर येथे राहण्यास होता. अमितला खेळाची आवड असल्याने तो नेहमी हॉलीबॉल, क्रिकेट खेळ खेळत होता. या खेळातून त्याचा मोठा मित्रवर्ग तयार झाला. अमितने अशी अचानकपणे आत्महत्या केल्याने त्याच्या नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.