शिवप्रहार न्युज - नगरला 61 % ,शिर्डीला 62 % मतदान;कोल्हारला अवैधरित्या शाई लावणारा तर शेवगावला मतदानाचा व्हिडिओ काढणाऱ्यावर गुन्हा…

शिवप्रहार न्युज -  नगरला 61 % ,शिर्डीला 62 % मतदान;कोल्हारला अवैधरित्या शाई लावणारा तर शेवगावला मतदानाचा व्हिडिओ काढणाऱ्यावर गुन्हा…

नगरला 61 % ,शिर्डीला 62 % मतदान;कोल्हारला अवैधरित्या शाई लावणारा तर शेवगावला मतदानाचा व्हिडिओ काढणाऱ्यावर गुन्हा…

नगर, दि. 13 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात 37- नगर व 38-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सोमवार, दि.13 मे रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले. 37-नगर लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण 61 टक्के तर 38-शिर्डी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

      लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दरम्यान नगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिली.