शिवप्रहार न्युज - 'शेजारी काय करता' असे विचारणाऱ्या बायकोला हरेगावात मारहाण ...
'शेजारी काय करता' असे विचारणाऱ्या बायकोला हरेगावात मारहाण ...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- शेजारच्या घरात जाऊन बसलेल्या नवऱ्याला तुम्ही येथे काय करता ? असे विचारल्याने नवऱ्याने बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार हरेगाव गावठाण येथे घडला आहे. याबाबत, रिना छोटू बागुल या महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे, त्यात म्हटले आहे की, आपले पती हे शेजारी असलेल्या सुनिता चाबुकस्वार हिच्या घरात बसलेले होते. तेव्हा आपण तेथे जाऊन तुम्ही येथे काय करता ? असे विचारले. याचा राग आल्याने पतीने घरी येवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आपणास मारहाण केली व जर माझ्या पंचायती केल्या तर तुला ठार मारील, अशी धमकी दिल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून छोटू राधू बागुल व सुनिता चाबुकस्वार यांच्याविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.